अभिनेत्री Deepika Padukone गरोदर! लग्नाच्या ५ वर्षांनंतर दीपवीरच्या घरी हालणार पाळणा?

Deepika Padukone Pregnancy Rumors : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये आपली उपस्थिती दर्शवली. दरम्यान, अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दीपिका लवकरच आई होणार असल्याचे समजत आहे.

द वीकच्या रिपोर्टनुसार, असा दावा केला जात आहे की, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग लवकरच आई-वडील होणार आहेत. या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने ही माहिती दिली आहे. सूत्राने सांगितले की, दीपिका आणि रणवीरने स्वतः त्यांच्यासोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे की ते लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

माहिती देताना सूत्राने पुढे सांगितले की, सध्या दीपिका पदुकोणचा दुसरा त्रैमासिक सुरू आहे. नुकतेच दीपिकाने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हापासून या बातमीच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. वास्तविक, बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडून गर्भधारणेच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, दोन्हीकडून ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या बातमीत किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा