मला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही – शरद पवार

Sharad Pawar: रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या (Ram Mandir) सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपा राम मंदिराचे राजकारण करीत आहे की व्‍यवसाय हे त्‍यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. मला राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही, माझी काही श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे मी जातो. धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्रश्न व्यक्तीगत आहे. ते मी जाहिरपणे सांगत नाही. असं देखील शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले

अयोध्‍येत राम मंदिर उभारले गेले, त्‍याचा आपल्‍याला आनंद आहे. साधारणपणे पूजा-अर्चना ज्‍या ठिकाणी होते, त्‍या ठिकाणी सहसा जात नाही. प्रत्‍येकाची वैयक्तिक श्रद्धा असते.असे पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत