परमेश्वरापेक्षा माझा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे – सावंत

उस्मानाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यातच आता त्यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. परमेश्वरापेक्षा माझा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचे सांगत २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यावर असलेल्या आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. (Marathwada) यावेळी सावंत यांनी त्यांच्याशी संवाद साधत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करणारा मी सुद्धा असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर माझा परमेश्वरापेक्षा जास्त विश्वास असून २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल. इतर कुणाचे आरक्षण काढून आपण मागायचे नाही, आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते कसे देतील याचा आपण विचार करायचा नाही. चुकीची मागणी करून वातावरण चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी असा सल्ला देखील सावंत यांनी यावेळी दिला.