राहुल महाजन चौथ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार? बाप बनायच्या वयात बनणार नवरदेव

Big Boss Fame Rahul Mahajan 4th Wedding: सलमान खानच्या धमाकेदार शो ‘बिग बॉस’मधून आपली छाप पाडणारा राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. राहुल महाजन याआधी ‘बिग बॉस 2’ चा भाग बनून चर्चेत आला होता, नंतर तो त्याच्या स्वयंवरमुळे प्रसिद्धीझोतात आला. राहुल महाजनने यावर्षी तिसरी पत्नी नतालिया इलिना हिच्यापासून घटस्फोट घेतला आहे. आता तो चौथ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

वास्तविक, राहुल महाजनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका परदेशी महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे, जो लगेचच चर्चेत आला. राहुल महाजनसोबतच्या फोटोमध्ये उपस्थित असलेल्या महिलेचे नाव अनास्तासिया खिजन्याक आहे. हा फोटो शेअर करत राहुल महाजनने लिहिले की, “अनास्तासिया खिजन्याकसोबतच्या काही आठवणी.” राहुल महाजनचा हा फोटो पाहिल्यानंतर लोक त्याच्या चौथ्या लग्नावर कमेंट करू लागले.

राहुल महाजनच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “तुम्ही चौथ्या लग्नासाठी तयार आहात का?” ही कमेंट पाहून राहुल महाजनला हसू आवरता आले नाही आणि त्यांनी इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली. आणखी एका यूजरने लिहिले की, “राहुल बाबा चौथीच्या मूडमध्ये आहेत.” राहुल महाजन यांना प्रश्न करत एका यूजरने लिहिले की, माझ्या मित्राचे पुन्हा लग्न होणार आहे का? तुम्हाला सांगतो की, राहुल महाजन किंवा त्यांच्या टीमकडून तो लग्न करणार आहे की नाही यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार