ओबीसी आरक्षण नाही टिकले तर राजकीयदृष्ट्या एक समूह संपुष्टात येईल – मुंडे 

तुळजापूर – या राज्यातील सरकार जनतेच्या नाहीतर स्वतःच्या हिताचे निर्णय घेत असल्याने महाराष्ट्रातील जनता यांना नाकारुन विकास धोरण ठेवण-या भाजपा पक्षाचा ( BJP ) मागे ठामपणे उभे राहील असे प्रतिपादन भाजप सरचिटणीस  पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी केले.

गुरुवार दि ७ रोजी दुपारी चार वाजत  मुंडे तुळजापुरात आल्या व थेट श्रीतुळजाभवानी देवीदर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या,  छञपती शिवाजीमहाराज महाराजांना भवानी प्रसन्न झाल्याने त्यांनी स्वराज्य सुराज्य स्थापन केले. आमच्या कडुन लोकांची सेवा घडू दे असे साकडे घातल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) बाबतीत मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी श्रीतुळजाभवानी व जोतीबाला मी साकडे घातले आहे.ओबीसी आरक्षण नाही टिकले तर माञ ओबीसी मुख्यप्रवाहात कधीही येऊ शकणार नाही त्याला संधी मिळणार नाही त्यामुळे राजकियदृष्ट्या एक समूह संपुष्टात येईल.

इंधन दरवाढी बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या,  इंधनदरवाढ कमी होईल याचा मला विश्वास आहे यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे सांगुन राज्यातील महाविकासआघाडी ( MVA ) सरकारने राज्यपातळीवर निर्णय घेवून इंधन दरवाढ कमी करावी व दिलासा द्यावा असे यावेळी म्हणाल्या.