‘मटणकरी या माकडाने राजसाहेबांना प्रश्न विचारण्या अगोदर ‘या’ गोष्टीचा खुलासा करावा’

नवी मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा सध्या वादात सापडला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली गेली असल्याचे आरोप राजकीय क्षेत्रातून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून ठाण्यातील विवियाना मॉलमधील हर हर महादेवच्या चालू शोमध्ये राडा घातला. मात्र मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पुन्हा हा शो सुरू केला.

यामुळे हर हर महादेव सिनेमावरून राष्ट्रवादी आणि मनसे (NCP vs MNS) आमनेसामने आले आहेत. अशातच वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा चिमटा काढला आहे. मनसेवर टीका करताना त्यांनी चक्क राज ठाकरे यांच्यावर हर हर महादेव चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आरोप केला आहे. यावरून आता मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी मिटकरी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्याअगोदर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मनात काय चाललंय, याची तपासणी करावी. अथवा राष्ट्रवादीची पळता भुई थोडी होईल, असा शब्दांत गजानन काळे यांनी अमोल मिटकरींवर टीकास्त्र सोडले आहे.

मटणकरी या माकडाने राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्या अगोदर अजितदादा हे पवारसाहेबांवर नाराज होवून काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? याचा खुलासा करावा.. अजितदादांनी कंपू बदलला तर पळता भुई थोडी होईल तुमची. स्वतःच्या गाडीत बसायला २ कार्यकर्ते नाहीत व बाता मोठ्या मोठ्या’, अशा आशयाचे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात अनुपस्थित होते. तसेच राज्याचे गृहमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवागाळ केल्याप्रकरणीही अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. यावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.