‘नैतिकतेचं भान असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजुला व्हावं’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा असतानाही शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरुन आता नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे म्हणाले, मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी (CM Uddhav Thackeray) सत्तेसाठी 145 मते लागतात.. तुम्ही अल्पमतात आला आहेत. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजुला व्हा. या महाराष्ट्राला 10 वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांचं लोकशाहीत असलेलं नातंही तुम्ही धुळीला मिळवलं. त्यामुळे सत्तेवर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही.असं राणे म्हणाले.