शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर काँग्रेसचा फुल्ल सपोर्ट – नाना पटोले

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा होताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव चर्चेत आले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकासाठी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) आणि महाविकास आघाडीचे (MVA)उमेदवार असावेत का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे,” असे नाना पटोले म्हणाले.