महीला उद्योग क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल – नारायण राणे

पुणे – देशातील एकूण उद्योग जगतात महिला फक्त 14 टक्केच आहेत परंतु अलीकडे महिलांचे उद्योग क्षेत्रात प्रमाण वाढत आहे , ते 30 टक्के झाले पाहिजे तसेच महिला जर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आल्या तर देश प्रगतीपथावर जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला .फिक्की महिला आघाडीने राष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात केले होते त्यावेळी ते बोलत होते .

पुढे ते म्हणाले की ,फिक्की ही संस्था महिला उद्योजकांसाठी फार मोठे काम करीत असून या संस्थेला बरोबर घेऊन पुण्यात लवकरच महिला उद्योजक निर्माण व्हावे यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग विभागामार्फत प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित देशभरातील महिला उद्योजिका यांना दिले .या केंद्रातून ग्रामीण भागातील महिलांना विविध लघु व हस्तकला तसेच इतर उद्योगाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी बनिविण्याचे काम करण्यात येणार येईल असे ते म्हणाले . तसेच आजच्या कार्यक्रमातून मला महिलांसाठी उद्योग व व्यवसायात महिलांसाठी विशेष काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे सांगून त्यांनी फिक्की महिला आघाडीचे व उद्योजिका यांचे कौतुक केले .

यावेळी देशभरातील महिलांच्या दुर्मिळ ,हस्तकला तसेच विविध वस्तंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याची पाहणी नारायण राणे यांनी केली व महिलांना प्रोत्साहन दिले .

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फिक्की पुणे च्या अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी फिक्की ने केलेल्या व पुणे जिल्ह्यातील 6 दत्तक घेतलेल्या गावांची माहिती दिली .तसेच या राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या आयोजना मागील भूमिका विषद केली .

या समारंभास फिक्की च्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया ,फिक्की पुणे अध्यक्षा निलम सेवलेकर ,वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर ,खजिनदार सोनिया राव ,पिंकी राजपाल यासह देशभरातून आलेल्या फिक्की महिला आघाडी पदाधिकारी व महिला उद्योजिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .