Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांमध्ये आहे इतके अंतर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स (Anant Radhika wedding ) मार्चच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहेत. या जोडप्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये केवळ बॉलिवूडचे सर्व स्टार्सच सहभागी होणार नाहीत, तर आंतरराष्ट्रीय कलाकारही सहभागी होणार आहेत.

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. राधिका मर्चंटसोबत त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची तयारी (Anant Radhika wedding ) सुरू झाली आहे. वृत्तानुसार, हे जोडपे 12 जुलै रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी, गुजरातमधील जामनगर येथील अंबानी इस्टेटमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले जाईल.

पण या सगळ्यामध्ये राधिका मर्चंट तिच्या भावी पतीपेक्षा वयाने किती मोठी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? राधिका मर्चंट ही बिझनेसमन वीरेन मर्चंटची मुलगी आहे. राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला होता. मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. अशा परिस्थितीत राधिका मर्चंट तिच्या भावी पती अनंतपेक्षा फक्त 4 महिन्यांनी मोठी आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव