अब संजय राऊत की बारी है . . . किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली – शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( ED Summons Sanjay Raut ) यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे ‘अब संजय राऊत की बारी है’, असे म्हणत भाजपनेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya Tweet ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील राजकारण आणखी तापणार आहे.

दरम्यान संजय राऊत हे दिल्लीत असल्यामुळे ते आजच्या ईडी (ED) चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे त्यांनी सध्या ईडीसमोर वेळ मागितली आहे. याआधीही संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावून त्यांची जबानी नोंदवली होती.

 

 

दरम्यान, या प्रकरणी 1 जुलै रोजी सुमारे 10 तास शेवटची चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण मुंबईतील पत्रा चाळ नावाच्या गृहसंकुलाच्या पुनर्विकासातील कथित घोटाळ्याशी संबंधित आहे. एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांच्या कौटुंबिक मालमत्ता जप्त केल्या होत्या.

संजय राऊत यांनी याला षडयंत्र म्हटले असले तरी तपासात सहकार्य करणार असल्याचे ठणकावून सांगितले. शेवटच्या चौकशीनंतर ते म्हणाले की, एजन्सीचे काम तपास करणे आहे. आमचे काम त्यांच्या तपासात सहकार्य करणे आहे. त्यांनी मला बोलावले होते म्हणून मी आलो आणि मी ईडीला सहकार्य करत राहीन.