यापुढे जावयाने आमचे हट्ट पुरवायचे आहेत हे लक्षात ठेवा; अजितदादांची तुफान टोलेबाजी 

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker of the Maharashtra Legislative Assembly) विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली.

ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.

दरम्यान,  यावेळी विधिमंडळात बोलताना माजी मंत्री अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. ते म्हणाले, आजपर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवत आलो आहोत यापुढे जावयाने आमचे हट्ट पुरवायचे आहेत हे लक्षात ठेवा. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे(Ramraje Naik Nimbalkar ) याचे जावई असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar )आमचेही जावई असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटले आहे.

राहुल नार्वेकर याचे अभिनंदनाचे भाषण करताना ही माहिती दिली आहे. सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी राहुल नार्वेकर आपण घ्या असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हश्या पिकाला.