चुकून मोबाईल पाण्यात पडलाय, गडबडीत ‘या’ गोष्टी करू नका; नाहीतर कायमचा होईल बंद

प्रत्येकाला स्वतःचा फोन आवडतो. पण तुम्हाला माहितीच असेल की जर तुमचा फोन चुकूनही पाण्यात पडला तर तो खराब होतो. फक्त वॉटर प्रूफ फोन पाण्यात पडल्यानंतरही ठीक राहतात, पण त्यालाही मर्यादा असते. जेव्हाही तुमचा फोन पाण्यात पडतो, तेव्हा तुम्ही घाईघाईने अशी काही पावले उचलता, ज्यामुळे तुमचा फोन नीट होण्याऐवजी जास्तच खराब होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही फोन पाण्यात पडल्यानंतर (Phone Accidently Fall In Water) करू शकता.

स्मार्टफोन पाण्यात पडला तर खोटे बोलू नका-
जर तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे पाण्यात बुडाला असेल आणि त्याची वॉरंटी नसेल. तर अनेकदा सेवा केंद्रात फोन पाण्यात पडल्याची बाब अनेकजण लपवून ठेवतात. सेवा केंद्रातील लोकांना याची सहज माहिती पडते, त्यामुळे त्यांच्यापासून ही गोष्ट लवपून ठेवण्याचा काही उपयोग होत नाही. पण जर तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे पाण्यात बुडाला नसेल तर कंपनी तुम्हाला वॉरंटी देखील देऊ शकते.

फोनवर हेअर ड्रायर वापरू नका-
फोन पाण्यात पडल्यावर बरेच लोक हेअर ड्रायरने त्याला वाळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हेअर ड्रायरमधून बाहेर येणारी हवा खूप गरम असते, ज्यामुळे फोनच्या नाजूक इलेक्ट्रॉनिक भागांना सहजपणे नुकसान पोहोचू शकते.

फोन पाण्यात पडल्यानंतर चार्ज करू नका-
जेव्हा तुमचा फोन पाण्यात पडल्यानंतर बंद झाला असेल आणि पुन्हा चालू होत नसेल, अशावेळी फोनला चार्र करू नका. कारण तुमचा फोन ओला झाल्यानंतर आणि अशा स्थितीत चार्जिंग केल्याने शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.

ओला फोन चालू करू नका-
जर तुमचा फोन पाण्यात पडल्यानंतर काम करत नसेल तर सर्वप्रथम तो बंद करा. कारण जेव्हा फोन चालतो, तेव्हा त्याचे सर्व भागही काम करतात. पण फोन ओला असल्यास त्याचा वापर करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.