Udayanidhi : ‘या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही’

अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही!

Udhayanidhi Sanatana Remarks:  INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरोधात चिथावणीखोर, प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही!कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांना मी विनंती करतो की, उदयनिधी स्टॅलिन, जोवर त्याचे विधान मागे घेत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी!अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही! असं लोढा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल