संतापजनक : वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा; चालू विद्युत वाहिनी तुटून घरावर पडली

गंगाखेड / विनायक  आंधळे – गंगाखेड (Gangakhed) शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणा मुळे त्रस्त (Electricity consumers are suffering due to the irresponsibility of the power distribution company) झाले आहेत. यातच आता वीज वितरण कंपनीचा आणखी एक हलगर्जीपणा (Negligence) समोर आला आहे. शहरातील ममता कॉलनी (Mamta Colony) परिसरात चालू विद्युत वाहिनी तुटून घरावर पडल्याची घटना घडली आहे. ऍड. तन्वीर शेख (Adv. Tanveer Sheikh) यांच्या राहत्या घरावर दि.१३ जुलै २०२२ बुधवार रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास ही तार तुटून पडली.

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातारण (An atmosphere of fear) तयार झाले आहे. उद्या जर असाच प्रकार घडला आणि यात कोणत्याही प्रकारची हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार असं या भागातील नागरिक आता विचारत आहेत. सोबतच पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी महावितरणने (MSEDCL) योग्य ती खबरदारी सुद्धा घ्यावी अशी मागणी होत आहे.