तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही – आव्हाड

ठाणे – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली (Ketaki Chitale Posted Poem on Facebook Against Sharad Pawar) आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील यावर भाष्य केलं.

अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांमध्ये चिड निर्माण होते. समजाता वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चिड निर्माण होते. जे आमच्या भगिनीनं लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहित नसेल शरद पवार यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते बाहेर आलेत. अशा परिस्थितीतही ते गावखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील ८३ व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी, मुलगीही पाहत असेल. त्यांना हृदय नाही का, आपलं असं काहीच नाही का?, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हीच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“ते मनानं खुप मोठे आहेत. तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांची लाळ गळतेय, त्यांना नरक मिळालं पाहिजे, ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तुम्ही असं बोलू शकत नाही. कोणाच्या व्यंगावर आजारावर टीका करायची नाही हे आपल्याला महाराष्ट्र धर्मानंच शिकवलं आहे,” असंही ते म्हणाले.