मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतं मोदी सरकार शेतकरी विरोधी- सुप्रिया सुळे

मुंबई- मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना मोदी सरकारवर टीका केली. मणिपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद असून याबादल सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. भाजपने नऊ वर्षांत नऊ सरकार पाडली असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) टीका केली.

मणिपूरवर बोलण्याआधी सुप्रियाताई सुळे यांनी अनेक मुद्दयावरून केंद्रसरकारवर टीका केली. सरकारने घेतलेल्या भूमिकांचा विचार करता आम्ही या सरकारवर विश्वास कसा ठेवणार असे सुप्रियाताई सुळेंनी म्हटले.  आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला कारण आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. सध्या लोकांच्या काय भावना आहेत हे आम्ही सांगू इच्छितो कारण आम्ही त्यांचे आवाज आहोत आणि हे आमचे कर्तव्य आहे असेही त्यांनी म्हटले. हा प्रस्ताव म्हणजे सध्याच्या भारतीयांच्या खऱ्या भावना असल्याचंही सुप्रियाताई सुळे यांनी म्हणले आहे

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की सरकार कामाचा प्रचार करताना नऊ वर्षातील नवरत्ने याचा उल्लेख करत आहेत. पण मी सरकारच्या नवरत्नांबाबत सांगू इच्छिते असे म्हणत सुप्रिया सुळेंनी समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारांच्या कामामध्ये हस्तक्षेप, महागाई, एलपीजी सिलिंडरचे वाढलेले दर देशातील महत्त्वाच्या संस्था मोडीत काढणे जुमलेबाजी करणे कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश ही सरकारची नवरत्ने असल्याचे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

केंद्रातील मोदी सरकार  शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सरकारकडून सांगितले जाते. मात्र ते खोटं आहे. कोणत्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले ते सरकारने स्पष्ट करावे. देशात वाढलेल्या प्रचंड महागाईवरूनही सुप्रियाताई सुळेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या संपूर्ण देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. युपीएच्या सरकारच्या काळात 500 रुपयाच्या आत असलेली थाळी ही आता 1000 च्या वर पोहोचली असल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. देशावर असलेले कर्ज 2014 मधील 55.87 लाख कोटींवरून 155.6 लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी सरकार एलआयसी, आयडीबीआय विकत आहेत आणखी काय विकतील माहिती नाही असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारची भूमिका ही कायम शेतकरी विरोधी राहिल्याचेही सुळे म्हणाल्या. मी कांद्याबाबत  सरकारला वारंवार विनंती केली होती. कांद्याच्या निर्यातीची मागणी करत होते कारण भारतात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन होते आणि जागतिक बाजारात कांदा नव्हता. पण सरकारने तसे केले नाही. उलट दुधाचे भरपूर उत्पादन असताना दुधाची आयात केली. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले पण त्याचे काय झाले. त्यामुळे जर सरकार शेतकरी विरोधी असतील तर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवणार असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहे

मणिपूरच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की मणिपूरमध्ये सरकारची अत्यंत लज्जास्पद भूमिका समोर आली आहे. लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मणिपूरमध्ये हिंसाचारात १७९ मृत्यू, ६० हजार लोक बेघर झाले, ३५० रिलीफ कॅम्प, कॅम्पमध्ये निर्वासित ४० हजार, ३६६२ घरं जाळली. ३२१ प्रार्थनास्थळं जाळली. १६१ केंद्रीय दलं तैनात करण्यात आली. १० हजारहून जास्त दंगली, हत्या, बलात्काराची प्रकरणं घडली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? असा परखड प्रश्न सुप्रियाताई सुळेंनी उपस्थित केला. पण सरकार एवढे असंवेदनशील का झाले आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महिलांसोबत जे काही घडले ते कसे घडू दिले जाते सरकार भूमिका का घेत नाही असेही सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. तुम्ही अशा सरकारला पाठिंबा कसा देऊ शकता. हे सत्ताधारी आणि विरोधकांबद्दल नाहीये. हे या देशाच्या महिलांच्या सन्मानाबद्दल आहे. तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढाल? असंही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. सरकारसमोर केवळ एकच उद्दिष्ट आहे ते म्हणते 2024 मध्ये सत्ता मिळवणे अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाले यावर बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, यांना फार हौस आहे नवरत्न वगैरे बोलण्याचा. गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय मिळवलं. भाजपानं पाडलेली राज्य सरकारं, महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर सरकारी संस्थांच पतन, भारताचं जागतिक स्तरावर घसरलेलं मानांकन आणि कायदा व्यवस्थेचा मुद्दा अशा शब्दांत सुप्रियाताई सुळेंनी मोदी सरकारवर टीका केल्या गेल्या ९ वर्षांत भाजपानं ९ सरकारं पाडली आहेत. अरुणाचल, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी आणि महाराष्ट्र सरकार दोन वेळा. महात्मा गांधींची सात पापं वगैरे अमित शाह म्हणाले. ते सिद्धांतांवर बोलले तेव्हा मला चांगलं वाटलं. त्यात ते म्हणाले पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल. जेव्हा भाजपा सत्तेत नव्हती तेव्हा ते म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स. पण तुम्ही वेगळे कसे ठरता? असा सवाल खा. सुप्रियाताई सुळेंनी उपस्थित केला.