पुण्यात आता कुत्र्यांप्रमाणे मांजरींचीही होणार नसबंदी 

पुणे –  पुणे महापालिकेने(Pune Municipal Corporation) घेतलेल्या मांजरींची नसबंदी करण्याच्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना आता कुत्र्याप्रमाणेच भटक्या मांजरीचींही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.या निर्देशाची अंमलबजावणी करत पुणे महापालिकेने कुत्र्यांप्रमाणेच मांजरीची ही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवली आहे.  पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी याबाबत माहिती दिली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मांजरांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर त्यांना पुन्हा  सोडले जाणार आहे.  (In Pune, like dogs, cats will also be sterilized).