IND vs PAK: हे भारतीय क्रिकेटपटू प्रथमच पाकिस्तानविरुद्ध खेळणार

2023 आशिया कप सुरू झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली

India vs Pakistan, 2023 Asia Cup: 2023 आशिया कप सुरू झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली आणि नेपाळविरुद्ध 238 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Pakistan captain Babar Azam)  बॅट जोरात गर्जत होती. मात्र, चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत.

टीम इंडियाचे अनेक क्रिकेटर्स आहेत, जे पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहेत. यात सलामीवीर शुभमन गिल, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास तेही पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळतील.

2023 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. चार वर्षांनंतर दोन्ही संघ वनडेत भिडणार आहेत. याआधी 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात दोघांमध्ये सामना झाला होता , ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आशिया चषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. याचा अर्थ 2 सप्टेंबरला ईशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल.

India’s probable playing XI against Pakistan -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.