भाजपच्या विकासाच्या मॉडेलमध्ये मंत्र्यांच्या संपत्ती वाढ आणि सामान्य गोवेकरांच्या संपत्ती घट

पणजी – आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सोमवारी वीज मंत्री नीलेश काब्राल यांच्या कुडचडे येथील बेकायदेशीर मालमत्तेचा पर्दाफाश केला काब्राल हे स्टार लाभार्थी असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला

पालेकर यांनी सांगितले की, साथीच्या आजारादरम्यान, गोवेकरांना त्यांची मालमत्ता विकण्यास भाग पाडले गेले आहे, मात्र काब्राल मालमता गोळा करत होते “साथीच्या रोगामुळे बर्‍याच लोकांच्या नोकऱ्या बुडाल्या आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत नष्ट झाले . सरकार मात्र काही खास व्यक्तींसाठी गुपचूप श्रीमंत होण्याचे कार्यक्रम राबवत आहे.” असा आरोप त्यांनी केला.

“निलेश काब्राल गेट रिच कार्यक्रमाचे स्टार आहेत . पाच वर्षांपूर्वी, ते दरमहा एक लाखापेक्षा कमी कमावत होते . सध्या, काब्रालचे उत्पन्न 25 पटीने वाढले आहे. ते आता महिन्याला 25 लाखांहून अधिक कमावतात, जे वार्षिक 3 कोटींहून अधिक आहे. हे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात कबूल केले आहे,” अस पालेकर पुढे म्हणाले.

कुडचडे मध्ये काब्राल यांच्या बेकायदेशीरपणे मिळवलेल्या मालमत्तेकडे लक्ष वेधून ते म्हणाले, “काब्रालने प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या संपत्तीपेक्षा बेकायदेशीर मालमत्तेची किंमत लक्षणीय आहे. शिवाय, ही मालमत्ता एका संवेदनशील झोनमध्ये आहे.” असा आरोप त्यांनी केला

त्यांची सध्याची संपत्ती गोव्याला मोफत वीज का देवू शकत नाही हे स्पष्ट करते. काब्राल स्वतःसाठी मालमत्ता जमा करण्यात व्यस्त असताना ते सामान्य गोवेकरांना दिलासा कसा देऊ शकतात अस पालेकर म्हणाले.

दिल्लीतील ७०% पेक्षा जास्त घरांमध्ये आता वीज बिल नाही. आम नागरिकांच्या कल्याणासाठी आम आदमी पक्षाने पैसा खर्च केला. आप चे नेते लोकांसाठी काम करत आहेत. आप हा भारतातील एकमेव असा पक्ष आहे जो भ्रष्टाचारमुक्त असल्याचा अभिमानाने दावा करू शकतो. हे प्रमाणपत्र आम्हाला इतर कोणीही नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांनी आमच्या मंत्री आणि नेत्यांच्या मागे सर्व एजन्सी (सीबीआय, ईडी इत्यादी) पाठवल्या. दिल्लीच्या उर्जामंत्र्यांच्या घराप्रमाणेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. त्यांनी आमचे सर्व रेकॉर्ड तपासले आणि कुठेही दोष आढळला नाही अस ते पुढे म्हणाले,

“एक गोवा म्हणून, प्रशासकीय किंवा प्रशासन कौशल्य नसलेल्या राजकारण्यांची निव्वळ अक्षमता पाहून मला राग येतो. आम्हाला यातून सुटका करावी लागेल. आता गोवेकरांनी ठरवायचे आहे की ते आपल्या वैयक्तिक संपत्तीच्या 25 पट वाढ करणाऱ्याला निवडतील की गोवा आणि गोव्याचा 25 पट विकास करणाऱ्याला आप कुडचडे चे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस म्हणाले, “गोयान कोलसो नाका मध्ये माझा सहभाग असल्याच्या संदर्भात, काब्राल यांनी माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. मग काब्रालने असंख्य झाडे तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?”.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.