गावाच्या विकासासाठी सरपंचांनी पुढे यावं – राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर – गावाच्या विकासासाठी सरपंचांनी विविध योजनाच्या माध्यमातून कामे करून घेण्यासाठी पुढे यावे, सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करु. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेली उदगीर पंचायत समितीची प्रशासकीय इमारत ही उदगीरच्या सौन्दर्यात भर घालणारी ठरावी. ठेकेदारांनी या इमारतींची कामे दर्जेदार करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उदगीर येथे राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून मंजूर करण्यात आलेल्या उदगीर शहरातील तीन वेगवेगळ्या नवीन वास्तूंच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पंचायत समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास बसवराज पाटील नागराळकर,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,सभापती शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, कल्याण पाटील,चंद्रकांत टेंगेटोल,उषा कांबळे, बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील ,उपसभापती रामराव बिरादार,प्रवीण भोळे, श्याम डावळे, ललिता झिल्ले, ज्योती स्वामी,ज्ञानेश्वर पाटील,ज्ञानोबा गोडभरले, माधव कांबळे,विदेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सदस्य, वि. का. संस्थेचे चेअरमन यांची उपस्थिती होती.

यावेळी बसवराज पाटील नागराळकर,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,सभापती शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, कल्याण पाटील,चंद्रकांत टेंगेटोल,बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील ,उपसभापती रामराव बिरादार,प्रवीण भोळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी केले. सभापती शिवाजीराव मुळे यांनी उदगीर पंचायत समिती च्या विकासासाठीचा अहवाल सादर केला.सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी तर आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी मानले.