Ratnagiri-Sindhudurg | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंचा प्रचार सभांचा धडाका; महायुतीत तणाव वाढणार ? 

Ratnagiri-Sindhudurg | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाराजांची मनधरणी करण्यसाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. त्यातच काही नव्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळं प्रस्थापित आणि विद्यमान खासदारपदी असणाऱ्या कैक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पक्षात बंड करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघात महायुतीत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाहीये  मात्र तरिही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका सुरु केलाय.. उद्या रत्नागरितल्या राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेच्या जाहीर सभा होणार आहेत.. या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेनंही दावा केलाय. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेसाठी लढण्यास इच्छुक आहेत.अद्याप या मतदारसंघात उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसतानाही राणेंनी प्रचारसभा सुरु केल्यानं महायुतीत तणाव वाढतोय का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत