Ind Vs Nz : भारत-न्यूझीलंड वनडे मालिका एवढी का आहे स्पेशल ? जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्ली – भारतीय संघाने वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० आणि त्यानंतर वनडे मालिकेत विजय मिळवत केली. आता टीम इंडिया न्यूझीलंडच्या(Ind Vs Nz)  यजमानपदासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि नंतर टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. जगभरातील क्रिकेट चाहते या मालिकेची वाट पाहत असतील कारण या मालिकेत बरेच काही पणाला लागणार आहे.

भारतीय संघ वर्षातील दुसऱ्या मोठ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. प्रथम श्रीलंकेसोबत घरच्या मैदानावर एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली, आता या दोन फॉरमॅटमध्ये संघाला न्यूझीलंड संघाचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. श्रीलंकेचा क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडियाला किवी संघाविरुद्धही असेच काही करायचे आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या वनडे मालिकेवर जगभरातील चाहत्यांसोबतच आयसीसीचीही नजर असणार आहे. खरं तर, श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केल्यानंतर टीम इंडियाला नंबर वन होण्याची संधी आहे. सध्या न्यूझीलंडचे ११७ गुण असून ते पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ 110 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर टीम इंडिया 3-0 ने जिंकण्यात यशस्वी ठरली तर भारताचे 114 गुण होतील, तर पराभवामुळे न्यूझीलंडचा संघ 111 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरेल. प्रत्येक मालिका संपल्यानंतर आयसीसी नवीन क्रमवारी जाहीर करते.

भारतात होणार्‍या आयसीसी वनडे विश्वचषकापूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा अव्वल फॉर्ममध्ये आला आहे. बांगलादेश दौऱ्यावर शतक झळकावल्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली. मोहम्मद सिराजने ज्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली, त्यात जसप्रीत बुमराहची उणीव अजिबात जाणवली नाही. कर्णधार रोहित शर्मा T20 विश्वचषक विजेतेपदाला मुकले होते, पण घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. त्याआधी चांगली टीम तयार करण्याचे टार्गेट आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ (Team India vs New Zealand) 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज, उमरान मलिक.(Rohit Sharma (captain), Shubman Gill, Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KS Bharat (wicketkeeper), Hardik Pandya (vice-captain), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav Mohammad Siraj, Umran Malik).

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (India-New Zealand ODI Series Schedule) 

पहिली वनडे, 18 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, हैदराबाद
दुसरी वनडे, 21 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, रायपूर
तिसरी एकदिवसीय, 24 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, इंदूर