Muralidhar Mohol | ‘या’ दिवशी मुरलीधर अण्णा दाखल करणार उमेदवारी अर्ज, मोदींची जाहीर सभाही होणार

यंदा प्रथमच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी होणार आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. तर मुरलीधर मोहोळ आपला उमेदवारी अर्ज येत्या २५ एप्रिल रोजी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भरणार असल्याची माहिती पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिलीय.

पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या महायुतीची महाबैठक रविवारी पुण्यात संपन्न झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यासंदर्भातील तयारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची येत्या 29 एप्रिलला पुण्यात होणारी जाहीर सभा याचं नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं.

येत्या 25 एप्रिल रोजी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यात येणार आहे‌. याच दिवशी निवडणूक अर्ज भरल्यानंतर डेक्कन येथील नदीपात्रामध्ये मुरली अण्णांच्या (Muralidhar Mohol) प्रचारासाठी सभा होणार आहे. अशी माहिती धीरज घाटे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर 29 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (एसपी कॅालेज) मैदानावर होणार आहे. या सभेस सुरुवात होण्यापूर्वी बालगंधर्व येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापासून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौकापर्यंत आणि तेथून पुढे टिळक रस्ता मार्गे सर परशुरामभाऊ महाविद्यालयापर्यंत मोदीजींचा रोड शो होणार आहे. या जाहीर सभेला महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचेही धीरज घाटे यांनी सांगितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन