बंडातात्या कराडकर यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राला गरज – एकनाथ शिंदे

पुणे – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संताच्या विचाराचा जागर महाराष्ट्रभर करणारे बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar)हे आमच्यासाठी सदैव पूज्यनीय आहेत त्यांनी आजपर्यंत केलेली संत साहित्याची सेवा व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळ धर्माच्या रक्षणासाठी केलेले काम ही महाराष्ट्राची अस्मिता आहे .यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांना झालेला पक्षघाताचा त्रास ही धक्कादायक घटना असून ते लवकरच या आजारातून बरे होतील असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून तात्याशी व्हिडिओ कॉल संपर्क साधून तब्येतीची चौकशी केली .

बंडातात्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे (Mangesh Chivate ) तात्काळ दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले व संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्वतोपरी काळजीपूर्वक उपचार करण्याचे आदेश दिले. दोन दिवस ते रुग्णालयातच हजर होते यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची बंडातात्यांचा व्हिडिओ कॉल प्रसन्नदारी संवाद घडवून आणला. यावेळी बंडातात्यांना बोलता बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी एका कागदावर लिहून मुख्यमंत्री शिंदे यांना संदेश दिला.

बंडातात्यांनी राज्यातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ प्रयत्न करावेत, महाराष्ट्रातील सर्व आध्यात्मिक क्षेत्र संत साहित्याची मंदिरे विकसित करणे भरघोस निधी द्यावा अशा सूचना बंडातात्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तुम्ही तात्काळ बरे होऊन भेटण्यासाठी या तुमच्या मनातील सर्व संकल्प पूर्ण करू असे आश्वासन दिले.  यावेळी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांनी सर्व परिस्थितीची व तब्येतीची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.मुख्यमंत्री यांनी अत्यंत संवेदनशील पणे बंडातात्यांची तब्येतीची चौकशी करून जे सहकार्य केले त्याबद्दल धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष आभार मानण्यात आली