रोहित नाम सूनके वडापाव समझे क्या ?, क्लीन स्वीप करने वाला कॅप्टन है मैं !

मुंबई : वेस्ट इंडीज विरूद्ध एकदिवसीय मालिकेपाठोपाठ भारताने टी-२० मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकली आहे. या मालिकेबरोबरच भारताने सलग ९ टी-२० सामने जिंकल्याचा पराक्रम केला आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीज संघावर १७ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करत भारताने वेस्ट इंडीज समोर १८५ धावांचा लक्ष्य ठेवला होता, मात्र वेस्ट इंडीज संघ फक्त १६७ धावाच काढू शकला. एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-ट्वेन्टी मालिकेत देखील भारताने निर्भेळ यश मिळवल्यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हून केलेल्या कामगिरीवर संपूर्ण देशातून स्तुतीसुमने उधळली जात आहे.

मागील हंगामात आयपीएलचा आँरेंज कँप विजेचा ऋतुराज गायकवाडला सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली परंतु तो फक्त ४ धावा काढू शकला. इशान किशान ३४ आणि श्रेयस अय्यरने २५ धावा काढून भारताचा धावफलक हलता ठेवला. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्याने फक्त ७ धावा काढल्या. शेवटी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने फक्त सहा षटकात ९१ धावांची भागीदारी रचली.

सुर्यकुमार यादवने १ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार ठोकत ३१ चेंडूत ६५ धावांची अफलातून अर्धशतकी खेळी साकारली. तर व्यंकटेश अय्यरने देखील सुर्यकुमार यादवला तोलामोलाची साथ दिली. अय्यरने १९ चेंडूत ३५ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्यामुळे भारतीय संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारता आली.

वेस्ट इंडीजकडून सलामीवीर जोडी अपयशी ठरल्यानंतर निकोलस पुरनकडून तिखट मारा करण्यात आला. पुरनने या मालिकेत सलग ३ अर्धशतकी खेळी केली. मात्र तो संघाला विजयी करण्यास अपयशी ठरला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांवर कात टाकली. हर्षल पटेलने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. तर दिपक चहर, रवी बिश्नोई, व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी २ गड्यांना बाद केले. सामनावीर आणि मालिकवीर हे दोन्ही पुरस्कार सुर्यकुमार यादवला देण्यात आले.