झुकेगा नही…! दादा साहेब फाळके पुरस्कारांत ‘पुष्पा’चा बोलबाला

मुंबई : दादसाहेब फाळके २०२२ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये भारतीय क्रिकेटपटू कपील देव यांच्या आयुष्याच्या आधारावर असलेल्या ८३ चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. तर किर्ती सेननला मीमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कायरा अडवाणी यांची भूमिका असलेला ‘शेरशाह’ चित्रपटाला २०२२ साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून जाहीर झाला आहे. तर अभिनेता विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाला समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना ‘शेरशाह’साठी सर्वोत्कृष्ट समीक्षक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला.

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तडप’ चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘कँडी’ ने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार जिंकला.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाला यावर्षी फिल्म ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकवणारा अभिनेता मनोज बाजपेयी यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मध्ये ‘वेब मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले. तर राधिका मेनन,अभिमन्यू दसानी, आयुष शर्मा, लारा दत्त, सतीश कौशीक, कनिका कपूर, शहीर शेख, अनुपमा, श्रद्धा आर्या, धीरज चोपडा, रूपाली गांगुली यांना देखील २०२२ साठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.