Indian Cricket team | सुपर आठ फेरीपुर्वी भारताचे ‘हे’ 2 खेळाडू मायदेशी परतणार, पण काय आहे कारण?

Indian Cricket team | टी20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. मात्र, टीम इंडिया 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळणार आहे. यानंतर ते सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 24 जूनला आमनेसामने येणार आहेत. मात्र त्याआधीच मोठी बातमी समोर येत आहे.

शुभमन गिल आणि आवेश खान परतणार घरी?
वास्तविक, भारतीय संघाचे (Indian Cricket team) खेळाडू शुभमन गिल आणि आवेश खान यांना टी20 विश्वचषकादरम्यान भारतात परतावे लागू शकते. या दोन्ही खेळाडूंना टी20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नसले तरी ते राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार शुभमन गिल आणि आवेश खान यांचा व्हिसा फक्त अमेरिकेपर्यंतच होता. भारतीय संघाने पहिले तीन सामने अमेरिकेत खेळले आहेत. आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळायचे आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि आवेश खान यांना व्हिसाशी संबंधित कारणांमुळे भारतात परतावे लागू शकते, कारण या दोघांकडे वेस्ट इंडिजचा व्हिसा नाही.

भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला…
भारतीय संघाने आपल्या टी20 विश्वचषकाच्या मोहिमेला शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला दणदणीत पराभव दिला. आयर्लंड आणि पाकिस्ताननंतर भारताने यजमान अमेरिकेचा पराभव केला. या सलग 3 विजयानंतर भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. मात्र, भारताला 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 24 जून रोजी सुपर-8 फेरीत आमनेसामने येणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप