Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग? शिवाजीनगर कोर्टात करायचे प्रॅक्टिस

Gangster Sharad Mohol murder – कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Killed) याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे.

दरम्यान, शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, शरद मोहोळ खून प्रकरणात दोन नामांकित वकीलांचा सहभाग असल्याची समोर आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाने या दोघांनाही काल इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणातील दोन आरोपी हे वकील आहेत. दोन्ही आरोपी हे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी आरोपी वकिलांची नावे आहेत. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ