Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

Gangster Sharad Mohol murder – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ(gangster Sharad Mohol) याची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली.

गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. या सर्व घडामोडींवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DeveNDRA fADNAVIS) यांनी या विषयावर भाष्य केले.

ते म्हणाले, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.”

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात