Manoj Jarange यांनी अखेर उपोषण सोडलं; मुख्यमंत्र्याचं केलं तोंडभरून कौतुक

Manoj Jarange – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे.

मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.

ते म्हणाले, राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आरक्षणात लक्ष्य घालून उपोषण सोडवण्यासाठी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. आरक्षण दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. मराठा समाजासह अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय