RCBvcDC: विराट कोहली आणि सौरव गांगुलीमधील भांडण सर्वांसमोर, ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

बेंगळुरू- दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२३ मधील विसावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २३ धावांनी जिंकला. या सामन्यात बेंगलोरचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि दिल्ली संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील भांडण जगासमोर आले आहे. विराट आणि गांगुलीचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शनिवारी झालेल्या या सामन्यात आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. विराट कोहलीने ३४ चेंडूत ६  चौकार आणि १ षटकारासह अर्धशतक झळकावले. क्षेत्ररक्षण करताना नेहमीप्रमाणे तो आपल्या आक्रमक शैलीत दिसला. १८ व्या षटकापर्यंत आरसीबी विजयाच्या जवळ पोहोचली होती. त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर कोहलीने अमन हकीन खानचा झेल टिपला.

विराट कोहलीने जिथे कॅच पकडला, तिथे जवळच दिल्ली कॅपिटल्सचा डगआऊट होता. बाकी टीमसोबत गांगुली तिथे बसला होता. जेव्हा कोहली कॅच घेतल्यानंतर फिल्डिंगला परतला तेव्हा तो गांगुलीकडे रागाने पाहत होता. मात्र गांगुलीने ना कोहलीकडे बघितले ना कोणतेच उत्तर दिले.

https://twitter.com/Sense_detected_/status/1647242820800090115?s=20

सामना संपल्यानंतरही दोघांमधील नाराजी दिसून येत होती. सामना जिंकल्यानंतर आरसीबी दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आणि संघाच्या सपोर्टिंग स्टाफशी हस्तांदोलन करत होते. तेव्हाच कोहली आणि गांगुली पुढे आले. मात्र, गांगुलीने आरसीबीच्या माजी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.