माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा मृतदेह घरात लटकलेला आढळला

आंध्र प्रदेश – ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन.टी. रामाराव (NTR) यांची मुलगी उमा माहेश्वरी यांनी सोमवारी घरी आत्महत्या (suicide)केल्याचे समोर आले आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या.

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) संस्थापक नंदामुरी तारका रामाराव अर्थात एनटीआर यांची धाकटी मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) हिने हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या वहिनीही होत्या.

उमा माहेश्वरी यांना आरोग्याच्या समस्या होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माहेश्वरी यांनी हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ती तिच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.