दफनभुमींची नाेंद महापािलकेकडे करणे बंधनकारक, ५०हून अधिक दफनभुमींची नोंदच नाही

पुणे- महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मालकीच्या माेजक्या दफनभुमी असुन, काही दफनभुमी या काही ट्रस्ट, समाज, खासगी मालकीच्या जागेत आहे. अनेक वर्षांपासून या दफनभुमीत अंत्यविधी केले जात आहेत. परंतु या दफनभुमींची महापािलकेकडे नाेंदणी झालेली नाही. या खासगी मालकीच्या जागेतील दफनभुमींची नाेंद महापािलकेकडे करणे बंधनकारक केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खासगी दफनभुमीची महापािलकेकडे नाेंदणी करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक बैठक पार पडली असुन, सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या दफन भुमींची सविस्तर माहीती घेण्याचे आदेश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापािलकेकडून स्मशानभुमी, दफनभुमीची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. स्मशानभुमींची मालकी महापािलकेकडेच असुन, या ठिकाणी हाेणाऱ्या अंत्यविधीची नाेंद महापािलकेकडे हाेत असते. तसेच मयताचा पास देताना, अंत्यविधीचे ठिकाण नमूद करावे लागत असते. त्यानंतरच अंत्यविधीचा पास दिला जाताे.

नाेंदणी का बंधनकारक ?
दफनभुमीत खाेदाईसाठी जादा पैसे माेजावे लागतात, त्याविषयीच्या तक्रारी महापािलकेकडे आल्या आहेत. तसेच परस्पर मृतदेहाची िवल्हेवाट लावली जाण्याचा धाेकाही असताे. यामुळे दफनभुमीत हाेणाऱ्या प्रत्येक अंत्यविधीची नाेंद हाेणे आवश्यक आहे. महापािलकेकडे प्रत्येक दफनभुमीची नाेंदणी नसल्याने प्रत्येक अंत्यविधीची नाेंद हाेत नसल्याचा दावाही प्रशासनाकडून केला जात आहे. खासगी मालकीच्या जागेतील दफनभुमीत केवळ अंत्यविधीचा पास दिला जाताे.  यामुळे  महापािलकेकडे दफनभुमीची नाेंदणी  करण्यासंदर्भात संबंधितांना पुढील काळात कळविण्यात येणार आहे.

सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून मागविली माहीती
महापािलकेच्या प्रशासनाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक बाेलाविण्यात अाली हाेती. या बैठकीत खासगी मालकीच्या दफनभुमींच्या नाेंदणीसंदर्भात चर्चा झाली. पुर्वी या दफनभुमी आणि स्मशानभुमी या मुख्य खात्याकडे हाेत्या. आता त्याची जबाबदारी ही क्षेत्रीय कार्यालयाकडे साेपविली गेली आहे. त्यानुसार त्यांच्यावर त्यांच्या हद्दीतील खासगी दफनभुमींची माहीती गाेळा करून सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

५० हून अधिक दफनभुमी
शहरात लहान, माेठ्या जागा असलेल्या सुमारे ५० हून अधिक दफनभुमी असुन, यामध्ये ख्रिश्चन, मुस्लीम आणि हिंदू धर्मातील काही समाजाकडून अंत्यविधी केल्या जातात. धर्म आणि विशिष्ठ जातींसाठी ठराविक दफनभुमींचा वापर केला जाताे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी झाल्यानंतर या दफनभुमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.