महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक

Ajit Pawar: ‘बैलगाडा शर्यत’ ही महाराष्ट्रातील ४०० वर्षांची परंपरा आहे. शेतकरी आणि बैलाच सुंदर नात दर्शवणारं बिग हिट मीडिया प्रस्तुत आणि प्रशांत नाकती म्युझिकल ‘आला बैलगाडा’ गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि ट्रेंडिंग गायिका सोनाली सोनावणे यांनी गायल आहे. तर प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात वैष्णवी पाटील, विशाल फाले, निक शिंदे आणि रितेश कांबळे या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. ‘हृतिक अनिल मनी’ आणि ‘अनुष्का अविनाश सोलवट’ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गाण्याविषयी म्हणाले, “अतिशय उत्तम गाणं झालं आहे. संगीतकार प्रशांत नाकती यांच्या सह विशाल फाले, वैष्णवी पाटिल, निक शिंदे आणि रितेश कांबळे या नवख्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. गाण्याचे निर्माते ऋतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी गाणं केल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक. यापुढील गाणी वेगवेगळ्या प्रकारची नव्या पिढीला भावतील आवडतील अशी करावी. या गाण्याच्या निर्मिती केलेल्या बिग हीट मीडियाच्या सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्या.”

Link –

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!