संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना पदावर राहणं योग्य नाही – फडणवीस 

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय.

नवाब मलिक यांच्या खात्याचा पदभार हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर गोंदियाच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakt tanpure) यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपची 50 टक्के मागणी मान्य झालीय का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 50 टक्के मागणी स्वीकारून फायदा नाही. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.