Munmun Dutta | ‘टप्पू’ने घेतली ‘बबीता’जींची विकेट, तारक मेहतामधील कलाकारांनी खऱ्या आयुष्यात उरकला साखरपुडा?

Munmun Dutta and Raj Anadkat Engaged | अलीकडे प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ खूप चर्चेत आहे. यावेळीही हा शो त्याच्या पात्रांमुळे चर्चेत आहे. बबिता जी आणि टप्पूच्या वैयक्तिक आयुष्यामुळे या शोची चर्चा रंगली आहे. ‘बबिता जी’ म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि ‘टप्पू’ म्हणजेच राज अनाडकट यांचा साखरपुडा झाल्याची बातमी आहे.

36 वर्षीय मुनमुनने 27 वर्षीय राजसोबत कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. पण मुनमुनच्या टीमने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मुनमुन दत्ता बबिताची भूमिका साकारत आहे तर राज दिलीप जोशीच्या मुलाच्या ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. राजने डिसेंबर 2022 मध्ये टीएमकेओसी शोमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली होती. दोन्ही कलाकारांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, मुनमुन आणि राज यांचा मुंबईबाहेर एका समारंभात साखरपुडा झाला. सुत्राने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच हा साखरपुडा झाला होता. दोघांनी वडोदरा (गुजरात) येथे अंगठ्याची देवाणघेवाण केली. मुनमुन आणि राजच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाते मान्य केले असून तेही या सोहळ्याला उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार