Virat Kohli | मला माझ्या देवाला एकदा भेटूद्या..! मैदानात धाव घेत चाहता विराट कोहलीच्या पाया पडला, Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपलेली नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. असेच काहीसे बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात पाहायला मिळाले. एका व्यक्तीने सुरक्षा कठडे तोडले आणि विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानाच्या मध्यभागी पोहोचला. त्याने सरळ जाऊन किंग कोहलीच्या पायाला स्पर्श केला, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला मैदानाबाहेर काढले. आरसीबीच्या डावात ही घटना घडल्याने सामना काही काळ थांबला होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आरसीबीला 177 धावांचे लक्ष्य मिळाले
आयपीएल 2024 चा सहावा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धवनच्या नेतृत्वाखाली संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या आणि आरसीबीसमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबी या सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

विराट कोहलीने 650 चौकार पूर्ण केले
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये 650 चौकार पूर्ण केले आहेत. त्याने सात चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. या धडाकेबाज फलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 238 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सात शतके आणि 50 अर्धशतकांच्या मदतीने 7284 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात किंग कोहलीने चेन्नईविरुद्ध एका षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या होत्या. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय