‘आता कॉंग्रेसमक्त भारत करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही’

बीड – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता याच मुद्यावरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram kulkarni) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना युपीए अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली त्यांचा युवा संघटनेने दिल्लीत कांग्रेस पक्षाच्या छाताडावर बसून करण म्हणजे काँग्रेस मुक्त देश करण्या साठी राष्ट्रवादी पक्षाने पुढाकार घेण्यासारखे  असल्याची टिका  कुलकर्णी यांनी केली.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची (Nana Patole) भुमीका सत्तेच्या लाचारी साठी एक पाऊल मागे घेणारी वाटते असा टोला त्यांनी मारला . काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही असं देखील ते म्हणाले.