पत्नीच्या शिक्षणासाठी पतीने दिवसरात्र एक केले, ऑफिसर बनताच पत्नीने नवऱ्याच्या आयुष्यात आणला भूकंप

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु काही स्त्रियांच्या यशामागे एका पुरुषाचाही हात असू शकतो. बरेलीमधील प्रांतीय नागरी सेवा अधिकारी ज्योती मौर्य यांच्या यशामागेही त्यांचे पती आलोक मौर्य यांचा मोठा वाटा आहे. आलोक मौर्य यांनी लग्नानंतर त्यांच्या पत्नीच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केले. पुढे जाऊन ज्योती चांगल्या पदावरही रुजू झाल्या. मात्र त्यानंतर त्यांनी आलोक सोबत जे केले, ते पाहून प्रेमावरुन कोणाचाही विश्वास उडेल.

आलोक यांच्या म्हणण्यानुसार २०१० मध्ये त्यांचे ज्योती यांच्याशी लग्न झाले होते. खूप कष्ट करून त्यांनी ज्योतीला शिकवले. लोकसेवा आयोगातून ज्योती यांना महिलांमध्ये तिसरा ऑफिसर देखील झाली. २०१५ मध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाला. २०२० पर्यंत सर्व काही ठिक होतं पण सोशल मीडियामुळेच त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. आलोक यांनी सांगितलं की, २०२० मध्ये ज्योती यांची ओळख गाजियाबादमध्ये कमांडंट होमगार्डशी ओळख झाली. अधिकारी असल्याने आम्हाला त्यात काही वावगं वाटलं नाही. पण २०२२मध्ये पतीने ज्योतीचे फेसबुकचे चॅट वाचले. त्यांचे हे संभाषण वाचून पतीच्या पाया खालील जमिनच सरकली. पुढे २२ डिसेंबर २०२२मध्ये आलोकने लखनऊमधील हॉटेलमध्ये ज्योतीला रंगेहाथ पकडलं होतं.

आपल्या प्रेमप्रकरणाविषयी समजल्यानंतर ज्योतील मागील आठवड्यापासून आलोकला स्वत:हून घटस्फोट दे नाहीतर मारून टाकेन असे सांगत आहे. या सर्वचे त्यांनी पुरावे देखील दिले आहेत. पत्नीने धुमनगंज पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. असा आरोप देखील पतीने केला आहे.