Municipal elections : राज्यातील महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये? 

मुंबई – मुंबई महानगरपालिकेसह (Mumbai Mahanagar Palika Election 2022) राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका (Mahanagar Palika Election News) नोव्हेंबर (November) महिन्यात होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असं डोळ्यांसमोर ठेवून शिंदे फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे. गणपती उत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंत्री आपापल्या जिल्ह्यात दौरा करून जनतेचा कल घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

प्रत्येक मंत्र्यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार असून जनतेचा शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूनं कल दिसला तर नोव्हेंबर मध्येच निवडणुका घेण्यासंदर्भात सरकार आग्रही राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ABPमाझाने याबाबत वृत्त दिले आहे.

मुंबई महापालिकेची तयारी म्हणून अमित शाहांचा (Amit Shah) झालेला मुंबईचा दौरा आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर ठाणे नवी मुंबई महापालिकेसाठी काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक (CM Eknath Shinde and Ganesh Naik) यांच मनोमिलन ही निवडणुकांचीच तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.