गुजरातमधील मोरबीमध्ये केबल पूल कोसळला, शेकडो लोक नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती

Morbi Cable Bridge Collapses : – गुजरातमधील मोरबी विभागातील मोरबी येथे रविवारी (३० ऑक्टोबर २०२२) केबल पूल कोसळला. या अपघातात शेकडो लोक नदीत पडले. त्याचवेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. बचावकार्य सुरूच आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.(A cable bridge collapsed in the Machchhu river, Morbi area today. Several people fear injured. )

मुख्यमंत्री म्हणाले की, मोरबी येथे झुलता पूल कोसळण्याच्या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.याआधी 14 ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी मुसळधार पावसामुळे केबल पूल कोसळल्यानंतर दक्षिण गोव्यातील दूधसागर धबधब्यातून 40 हून अधिक पर्यटकांना वाचवण्यात आले होते, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.