भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महिला आघाडीच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानात सोमवारी महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात श्रीमती सुलताना खान यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
आपल्या पत्रकार परिषदांमध्ये नवाब मलिक सातत्यानं महिलांचा अपमान करत असल्यानं त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.
सुलतान खान म्हणाल्या की, मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी नियुक्त करण्यात आलेले असताना ते मात्र ड्रग्स विकणारे आणि त्याचे सेवन करणाऱ्यांना समर्थन देताना, तसेच सातत्यानं महिलांचा अपमान करताना दिसत आहेत. यावेळी उर्दू साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. अहमद राणा उपस्थित होते.
https://youtu.be/3AmlxDP4tcU