हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या मालवणीच्या माझ्या भगिनींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन – मंगल प्रभात लोढा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी आज लोअर परेल येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना आमंत्रित केले होते. या प्रसंगी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केले. लोअर परेल येथे हा सोहळा संपन्न झाला.

मुंबई उपनगरात मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह पालकमंत्री लोढा यांचे दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात होणाऱ्या सामाजिक उपक्रमांना आवर्जून उपस्थित राहून येथील हिंदू समाजाला आधार देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. गेली ३ वर्ष पालकमंत्री लोढा स्वतः या परिसरात जाऊन येथील दलित हिंदू महिलांसह रक्षाबंधन साजरे करतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात. मालवणी येथील आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या, हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या माझ्या भगिनींच्या संरक्षणासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन व त्याच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन असे वचन पालकमंत्री लोढा यांनी येथील महिलांना दिले आहे.