विरोधकांची आता खैर नाही; आणखी एका ठाकरेंची राजकारणात होणार एंट्री ?

मुंबई : राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत (Shivsena) यादरम्यान मोठी फुट पडल्याचे दिसत आहे. शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा होत असताना आता राजकारणात आणखी एका ठाकरेंची एंट्री होणार आहे. 15 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबीयांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होणार आहे. युवा सेनेची धुरा ही तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आदित्य ठाकरेंचीही (Aditya Thackeray) शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेची ग्राऊंडवर पकड मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्वभावाशी समरस असलेल्या तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास सेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा (Shiv Sainik) आत्मविश्वास वाढेल, अशी चर्चा तसेच मत युवा सैनिकांनी व्यक्त केले आहे.