पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांच्या दाव्याने खळबळ 

Jayant Patil  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

एबीपीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील म्हणाले की,  मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी वक्तव्ये केली त्याला फार महत्त्व आहे, असं मला वाटत नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केलं. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार गेले म्हणून सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही.