अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचं झालं मोठ भांडण? तुफान व्हायरल होतोय फोटो

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) नुकतेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते. या दोघांचे पार्टीतील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, कारण हे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र हे फोटो व्हायरल होताच एक फोटो समोर आला, ज्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये भांडण (Aishwarya Rai Abhishek Bachchan Fight) झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

या फोटोमुळे खळबळ उडाली
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी सुभाष घई यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पॅपराझींसमोर पोज दिले. यादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या दोन स्टार्सच्या चेहऱ्याचे हावभाव आणि बॉडी लँग्वेज पाहून त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अभिषेक बच्चनची पाठ दिसत आहे, तर ऐश्वर्या राय बच्चनचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चनला पाहून यूजर्सना वाटले की तो रागात ऐश्वर्याला काहीतरी बोलत आहे आणि ऐश्वर्याही त्याच्याकडे रागाने पाहत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यांच्या भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

हा फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘सगळं ठीक नाही असं वाटतंय.’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘असे दिसते की त्यांच्यात भांडण झाले आहे.’