Vallabh Benke | शरद पवार यांचे खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Vallabh Benke Passes Away : शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके (Vallabh Benke) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी रविवारी अल्पशा आजाराने रात्री १०.३०च्या सुमारास निधन झाले. अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ४ वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे.

शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला; अजित पवार
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला CAA ची आठवण, नेहमीप्रमाणे CAA हाही ‘चुनावी जुमलाच’

‘ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या…’, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया