जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि मोफत ऑफर

जर जिओ ग्राहकांना (Jio Customer) 2 जीबी डेटासह परवडणारा प्लान हवा असेल तर त्यांना अनेक रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans) मिळतील. हे प्लॅन 249 रुपयांपासून सुरू होतात. दररोज 2 जीबी डेटा ऑफर करणार्‍या जिओच्या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 2,879 रुपये आहे. या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स देण्यात येत आहेत. जिओच्‍या 300 रुपयांपेक्षा कमीच्‍या प्‍लॅनबद्दल सांगत आहोत जे दररोज 2 GB डेटा देतात.

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच, ग्राहक एकूण 56 GB हाय-स्पीड 4G डेटाचा लाभ घेऊ शकतात. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्सची ऑफर देण्यात आली आहे. जिओचे ग्राहक देशभरात स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा आनंद घेऊ शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये JioTV, Jio Cinema, JioSecurity, JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. 5G वापरणाऱ्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा दिला जातो.

249 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 46 जीबी डेटा घेऊ शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या रिचार्ज प्लॅनमध्ये देशभरात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचा मोफत प्रवेश मिळू शकतो. जे ग्राहक 5G नेटवर्क वापरत आहेत त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.

याशिवाय रिलायन्स जिओचे 2,879 रुपये, 719 रुपये आणि 533 रुपयांचे प्लॅन देखील आहेत, ज्यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. या सर्व प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत.