World Cup Final : भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी अंतिम सामन्यावेळी स्वतः मोदी हजर राहणार

World Cup Final : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 3 गडी राखून मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या रविवारी अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल.

काल कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं 7 गड्यांच्या मोबदल्यात 48व्या षटकात पूर्ण केलं; आणि आठव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेच टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर टीम इंडियाने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकलाय.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असतील. इतकच नाही, या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. निमंत्रण स्वीकारुन ते सुद्धा फायनल पाहण्यासाठी येतील, अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-